भाविकांचे श्रद्धास्थान देवराई येथील व्यंकटेश बालाजी देवस्थान
पाथर्डी तालुक्यातील देवराई येथील ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश बालाजी हे जिल्ह्यातील नाथ परंपरेतील प्राचीन व धार्मिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते .या देवस्थानला पूर्वी ग्वाल्हेरच्या तत्कालीन राजाकडून सनद पुरवली जात होती
सुमारे २००० वर्षाचे हे प्रचींन मंदिर हेमाडपंथी स्वरुपात उभे होते. आता मात्र येथे मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. याच मंदिराजवळ ऎतिहसिक बारव आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते . या वेळी राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात .तसेच गोकुळाष्टमी निमीत्त येथे धार्मिक कार्यकामचे आयोजन केले जाते . देवराई गावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गावापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे मच्छिंद्रनाथाल व गोरक्षनाथ यांनी सोमयाग यज्ञ घातला. यावेळी सर्व देव देवतांना आमंत्रित करून महाप्रसादाचे आयोजन केले .त्यावेळी उपस्थित देव देवतांनी भोजनासाठी जेथ पयंत रांगा लावल्या ते ठिकाण म्हणजे देवराई अशी या गावाची ओळख आहे. यज्ञ सांगतेनंतर उपस्थित देव देवतांना सन्मानित करून धन धान्य सुवर्णमुद्रा व अलंकार देऊन स्वगृही पाठविण्यात आले.
उर्वरित संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी भगवान विष्णू अर्थात व्यंकटेश बालाजीवर टाकून भगवान आदिनाथ वृद्ध रुपात येथेच थांबले तेच हे प्रसिद्ध ठिकाण श्री क्षेत्र वृध्देश्वर म्हणून ओळखले जाते. म्हणून धन धान्य पैसा आदीचे रक्षण व्यंकटेश बालाजी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री क्षेत्र वृध्देश्वरला व मढी ला दूरवरून दर्शनासाठी येणारा भाविक प्रथम देवराई येथे व्यंकटेश बालाजी चे दर्शन घेऊन पुढे जातो.

मंदिराचा जीर्णोद्धर :-
सन २००९-२०१० या कालावधीत मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून खासदार दिलीप गांधी याच्या निधीतून सभामंडप तर ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मंदिरचे काम चालू आहे . दोन वर्षापूर्वी राजस्थान येथून आणलेली काळ्या स्फटिकाची आकर्षक बालाजीची मूर्ती विधिवत बसविण्यात आली आहे मंदिराचे शिखर व गाभारा व सभामंडप अशी आकर्षक स्वरुपाची कामे करण्यात आली आहे.
इतर पूर्ण झालेली कामे :-
- संकटमोचन हनुमान मंदिर :- हनुमानच्या मूर्तीची स्थापना रामदास स्वामीनी केलेली आहे. ही मूर्ती दक्षिण मुखी असून तेलाची आहे. २००८ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे.
- रेणुका माता मंदिर :- रेणुका माता देवीचा आकर्षक अशा तांदळा आहे. तसेच शिखराचे सुंदर असे काम नांदेड येथील कारागिराने पूर्ण केले असून मंदिराचे आतील संपूर्ण काम देवराई येथील भक्ताने पूर्ण केले आहे.
- जि. प. सदस्य अर्जुनराव शिरसाठ यांच्या निधीतून पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- देवराई ग्रामपंचायतने मंदिर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रेटचे काम पूर्ण केले.
येथील बालाजीची यात्रा ऑगस्ट महिन्यात असते. बालाजीला पैठण वरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने रात्री १२ वाजता म्हणजे गोकुळाष्टमी च्या दिवशी जलाभिषेक घातला जातो. याच दिवशी भाविकांनी आणलेल्या कवडीची मिरवणूक काढली जाते यावेळी फटक्याची आतिषबाजी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची पोथी वाचली जाते . तसेच बालाजी सार्वजनिक ट्रस्ट कडून विद्ययुत रोषणाई केली जाते .