गुरुवार, ७ जुलै, २०११

अहमदनगर ओळख


राज्याच्या मध्यभागी असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेस नाशिक व औरंगाबाद जिल्हे; पूर्वेस बीड ; पूर्व व आग्नेयेस उस्मानाबाददक्षिणेस सोलापूर ; तर नैऋत्येस व पश्र्चिमेस पुणे व ठाणे हे जिल्हे वसलेले आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठा असणार्या या जिल्ह्याने राज्याचे ५.५४% भौगोलिक क्षेत्र व्यापलेले आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रामुख्याने अकोले व संगमनेर तालुक्यांत सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई याच डोंगररांगामध्ये अकोले तालुक्यात (नगर, नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर) आहे. याची उंची १६४६ मीटर आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडील प्रमुख डोंगररांग हरिश्र्चंद्राचे डोंगर या नावाने ओळखली जाते. जिल्ह्याचा काही मध्य भाग व उत्तर भाग हा बालाघाटचे पठार या नावाने संबोधला जातो. तसेच जिल्ह्याचा दक्षिण भाग हा घोडनदीभीमा व सीना या नद्यांचे खोरे म्हणून ओळखला जातो.
गोदावरीभीमासीनामुळा व प्रवरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून आढळाढोरा, घोडनदी, कुकडी याही नद्या जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या सीमा भागातून वाहतात. बहुतांशी नद्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात.गोदावरी या महाराष्ट्रातील प्रमुख नदीची या जिल्ह्यातील लांबी सुमारे १५० कि.मी. आहे. प्रवरा व गोदावरी नद्यांचा संगम नेवासे तालुक्यात होतो, या स्थळाला प्रवरासंगम असे म्हटले जाते.
अकोले तालुक्यातील डोंगराळ भागात भंडारदरा येथे प्रवरा नदीवर १९२६ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. भारतातील जुन्या धरणांत याचा समावेश केला जातो.
मुळा नदीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण राहुरी तालुक्यात बांधण्यात आले आहे. या प्रकल्पातूनच अहमदनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. येथील जलाशयास ज्ञानेश्र्वरसागर असे म्हटले जाते. अहमदनगर जिल्ह्यातील सिंचनात प्रामुख्याने विहिरींचा वाटा जास्त आहे.
नगर जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. पश्र्चिमेकडील डोंगराळ भागात हवामान आल्हाददायक आहे. जिल्ह्यात रोजच्या कमाल व किमान तापमानातील तफावत पाहता ती लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे आढळते. जिल्ह्याच्या पश्र्चिमेकडून पूर्वेकडे पाऊस कमी होत जातो. प्रामुख्याने जिल्ह्याच्या पूर्वेकडील भाग अवर्षणग्रस्त आहे.

या जिल्ह्याच्या नावावरूनच पूर्वीच्या काळात या भागावर असलेल्या निजामशाही व मुघल साम्राज्याचे वर्चस्व लक्षात येते. रामायणकाळात अगस्ती ऋषीनी विंध्य पर्वतओलांडून गोदावरीच्या किनार्‍यावर (आत्ताच्या नगर जिल्ह्याच्या परिसरात) वसाहत स्थापन केल्याचे आणि त्यांची व श्रीरामाची भेट झाल्याचे मानले जाते. आणखी महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली मानवी वसाहत याच जिल्ह्यात प्रवरा व गोदावरी नद्यांच्या किनार्‍यावर झाली, असा निष्कर्ष पुण्याच्या डेक्कन कॉलेजने नेवाशातील उत्खननानंतर काढला आहे.भारतीय पुरातत्व विभागाने श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद येथे केलेल्या उत्खननातून या जिल्ह्यात सिंधु संस्कृतीचेआस्तित्व सिध्द झालेले आहे.
१५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, १४९० मध्ये सीना नदीकाठी शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्‍हाणशहा, सुलताना चॉंदबिबीयांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे १६३६ पर्यंत टिकली.
निजामशाहीच्या पडत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी छोट्या मूर्तझा निजामशहाला मांडीवर घेऊन नगरचा कारभार पाहिला. पुढे काही काळ नगरने मराठेशाही व शहाजहान बादशहाची मुघलशाही अनुभवली. १७५९ मध्ये नगर पेशव्यांकडे आले आणि १८०३ मध्ये ते इंग्रजांच्या ताब्यात गेले. १८१८ पासून नगरवर पूर्णपणे इंग्रजांचा अंमल होता. १८२२ मध्ये ब्रिटिशांनी नगर जिल्ह्याची स्थापना केली.
१९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूसरदार वल्लभभाई पटेलमौलाना आझादडॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. पी.सी.घोष यांनी हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन हा ग्रंथ शब्दबद्ध केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीथॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार - ए - खातिर हे ग्रंथ याच शहरात लिहिले.