श्री दत्तधाम चांदा!!!
अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे तसेच अध्यात्मिक दृष्ट्या देखील महत्वाचा आहे . अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर मोहता देवी , देवगड नेवासा ई. हि सर्व ठिकाणे जगाचे लक्ष वेधून घेत आहेत .श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी .
अशाच या नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकापासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे - औरंगाबाद महामार्गावर घोडेगाव पासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी - शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्यामार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व अध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे .. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. . अनेक थोर संत महापुरुषांचे वास्त्यव्य या गावात झाले आहे .जुन्या काळी जेव्हा मोघालांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराज सुद्धा या गावात आले होते . आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे . आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय .
श्री दत्त साधकाश्रामाची सुरुवात प पु गु ह भ प श्री संत रोहीदासजी महाराज यांनी केली . त्यांनी त्यांच्याकठोर तपश्चर्येचे प्रतिक म्हणून हा आश्रम उभारला आहे. प पु गु सद्गुरू रोहीदासजी महाराज हे मुलाचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सूर होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेद होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी व समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे ठरवले. व या ठिकाणाला अध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन श्री दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने आवळून आणलेली श्री दत्त मूर्तीची स्थापना केली. याच श्री दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसन ग्रस्तांना व्यसन मुक्त केले. व अनेकांना भगवंताचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर मध्ये अध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.
सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरुपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.
दत्त साधकाश्रामच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो .
त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे.
येथील वर्षातील महत्वाचे कार्यक्रम पुढील प्रमाणे...
१. गुरुपोर्णिमा - आषाढ शुध्द पोर्णिमा
२. तुकारामबीज सप्ताह - फाल्गुन बीज - ध्यान शिबीर ७ दिवस
३. दत्त जयंती सोहळा - डिसेंबर
Nice Blog. Thanks for sharing this valuable information.
उत्तर द्याहटवाUttarakhand Garhwal tourism